मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’ आगमन मिरवणुकीत मोठी दुर्घटना; वेल्डिंग निघाल्याने २२ फूट उंच मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, ५ जखमी
मुंबई, (शनिवारी, २२ ऑगस्ट) :
मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, शनिवारी (२२ ऑगस्ट) रात्री एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मुंबईच्या प्रसिद्ध ‘भुलेश्वरचा राजा’ सार्वजनिक गणेश मंडळाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान २२ फूट उंच महाकाय मूर्ती अचानक कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात मंडळाच्या अध्यक्षांसह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन लहान मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री साडेदहा ते सपोपाने पावणेअकराच्या दरम्यान दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरातील जय आंबे चौक, कबुतरखाना जवळ, डॉ. आत्माराम मर्चंट रोडवर घडली. लालबागहून ‘भुलेश्वरचा राजा’ या २२ फूट उंच आणि तब्बल साडेतीन टन वजनाच्या भव्य गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक अत्यंत उत्साहात काढण्यात आली होती. मिरवणूक जेव्हा अगदी मंडपापासून अवघ्या ५० ते ६० फूट अंतरावर आली होती, त्याच वेळी हा अनर्थ ओढवला.
मूर्ती ज्या लोखंडी फ्रेम आणि ट्रॉलीवर उभी करण्यात आली होती, त्या सपोर्टची वेल्डिंग निकृष्ट निघाल्यामुळे किंवा अचानक तडकल्यामुळे मूर्तीचा तोल सुटला. मूर्तीचा मागचा भाग व समोरील आधार सुटल्याने ती थेट मिरवणुकीत चाललेल्या लोकांच्या अंगावर कोसळली आणि त्याचे तीन तुकडे झाले. या अचानक झालेल्या भीषण प्रकारामुळे रस्त्यावर एकच तारांबळ उडाली आणि आनंदाचे वातावरणात शोककळा पसरली.
मृत आणि जखमींची नावे व सविस्तर माहिती:
या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाल्यामुळे दोन जणांचा प्राण गेला आहे:
१. संकेत नेवशे (वय ३३) – हे ‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांना तातडीने गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
२. बृजेश हेमंत जोशी (वय ३८) – यांना जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अलावा या अपघातात ५ जण जखमी झाले असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे:
लावण्या गनेर (वय ५) आणि दिव्या गनेर (वय ७) या दोन चिमुकलींसह कुणाल काशिद (वय २६) यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वैभव घेनंद (वय ३८) आणि पवन चौरसिया (वय २५) यांच्यावर जी. टी. रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच व्ही. पी. रोड आणि एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी, मुंबई महानगरपालिका (BMC) पथक आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात halavle. याप्रकरणी डी. बी. मार्ग आणि व्ही. पी. रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद करून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. दरम्यान, प्रशासकीय नियमांची पायमल्ली आणि अती-उंच मूर्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संपूर्ण मुंबईत हळहळ व्यक्त होत आहे.
Team The Kesari Press