The Kesari Press

थेट बातमी, अचूक विश्लेषण

The Kesari Press

थेट बातमी, अचूक विश्लेषण

Blog

कोकणातील सहा तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू

पुण्यातील सहा तरुण कोकण पर्यटनासाठी जात असताना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात एका भीषण अपघातात यातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सोमवारी रात्री उशिरा थार गाडी एका धोकादायक वळणावरून सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने पुण्यासह रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात शहाजी चव्हाण (२२), पुनित सुधारक शेट्टी (२०), साहील साधू बोटे (२४), श्री महादेव कोळी (१८), ओंकार सुनील कोळी (१८) आणि शिवा अरुण माने (१९) या सहा मित्रांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण पुण्यातील उत्तमनगर परिसरातील रहिवासी होते.

#tamhinighat #accident #tharaccident

ही बातमी शेअर करा