The Kesari Press

थेट बातमी, अचूक विश्लेषण

The Kesari Press

थेट बातमी, अचूक विश्लेषण

Blog

ब्रेकिंग न्यूज : पुलवामा हल्ल्याचा आणखी एक हिशोब चुकता ! पाकिस्तानात ‘लष्कर’चा टॉप कमांडर हम्झाची गोळ्या झाडून हत्या ; ४० जवानांच्या शहिदाचा बदला!

Thekesaripress.com

विशेष वृत्त, नवी दिल्ली/कराची :

भारताच्या कुरापती काढणाऱ्या आणि २०१९ मधील भीषण ‘पुलवामा आत्मघाती हल्ल्यात’ (Pulwama Attack) भारताच्या ४० जवानांचे रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्यांना आता पाकिस्तानातही सुरक्षित राहता आलेले नाही. ‘लष्कर-ए-तैयबा’चा (LeT) सर्वात खतरनाक आणि टॉप कमांडर अदनान अहमद उर्फ ‘हम्झा’ याचा पाकिस्तानातील कराचीमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गेम ओव्हर केला आहे. संरक्षण यंत्रणा आणि न्यूज चॅनल्सकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, या हम्झाचा पुलवामा हल्ल्याचा कट रचण्यात आणि दहशतवाद्यांना रसद पुरवण्यात थेट हात होता.

कराचीच्या रस्त्यावर थरार ! एकामागून एक ४ गोळ्या झाडल्या

न्यूज चॅनल्सनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना अत्यंत फिल्मी आणि थरारक पद्धतीने घडली:

दबा धरून बसलेले हल्लेखोर : हम्झा हा कराचीमधील एका सुरक्षित समजल्या जाणाऱ्या घरामधून बाहेर पडत असतानाच, आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याला घेरले.

जागीच कोसळला : हल्लेखोरांनी अत्यंत जवळून हम्झावर अंधाधुंद गोळीबार केला. त्याच्या छातीवर आणि पोटावर ४ गोळ्या लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला.

आयएसआयची (ISI) गुप्तता : गोळीबारानंतर पाकिस्तानाची गुप्तहेर संघटना ‘ISI’ ने तातडीने त्याला कराचीच्या एका मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पाकिस्तानची नाचक्की होऊ नये म्हणून लष्कराच्या पहाऱ्यात त्याच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुलवामा हल्ल्याशी काय होता ‘हम्झा’चा संबंध ?

सध्या न्यूज चॅनल्समध्ये दाखवल्या जाणाऱ्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यात या हम्झाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती :

शस्त्रास्त्रांची आणि निधीची सोय : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानातून काश्मीर खोऱ्यात छुपा निधी (टेरर फंडिंग) आणि चिनी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी हम्झा सांभाळत होता.

जैशनंतर लष्करची मदत : पुलवामा हल्ला जरी ‘जैश-ए-मोहम्मद’ने घडवून आणला असला, तरी पाकिस्तानातून ‘लष्कर-ए-तैयबा’चा हाच कमांडर हम्झा पडद्यामागून जैशच्या दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत पुरवत होता.

आत्मघाती दहशतवाद्यांचे ट्रेनिंग : काश्मीर सीमेवर आत्मघाती (फिाईन) दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी कशी करायची, याचे स्पेशल ट्रेनिंग देण्यामध्ये हंजला उर्फ हम्झा पटाईत होता.

ही बातमी शेअर करा